हे आहेत दुर्वाचे औषधी गुण

सहज उपलब्ध असणारा दुर्वा आहे अनेक व्याधीसाठी लाभदायक

0

दुर्वा ही धार्मिक महत्त्वामुळे ओळखली जाते, मात्र त्यात अनेक औषधी गुण देखील आहेत. अनेक रोगांवर आणि व्याधीवर ही दुर्वा उपयोगी आहेत. तर जाणून घेऊया दुर्वाचे औषधी गुण

काय आहेत दुर्वाचे आयुर्वेदिक महत्त्व ?

  • उन्हात फिरल्याने किंवा जास्त उन्हाळ्यामुळे बर्‍याचदा नाकातून रक्त वाहू लागते. त्याला घोळणा फुटणे असे म्हणतात; परंतु सातत्याने घोळणा फुटणे हे नक्कीच हानिकारक आहे. त्यावर इलाज म्हणून दूर्वा वाटून त्याचा रस काढावा. त्याचे चार-पाच थेंब नाकात टाकावेत. त्यामुळे हा त्रास आटोक्यात राहील.
  • वेळी-अवेळी खाल्ल्याने अनेकदा अंगातील उष्णता वाढते. त्यामुळे तोंड येते किंवा तोंडात लालसर फोड येतात. त्यासाठी दूर्वांचा रस पाण्यात मिसळून या पाण्याने गुळण्या कराव्यात. तीस सेकंद गुळणा करून पाणी थुंकून टाकावे.
  • बागेत उगवणार्‍या दूर्वा डोकेदुखीमध्ये लाभदायक असतात. कोणाचेही डोके दुखत असल्यास दूर्वा वाटून त्यात थोडा चुना मिसळून त्याचा लेप डोक्यावर लावावा. काही वेळाने थंड पाण्याने हा लेप धुऊन टाका. त्यामुळे डोकेदुखीपासून मुक्तता मिळेल.
  • डोळे जळजळत असतील किंवा डोळ्यांशी निगडित आणखी काही समस्या असेल तरीही या दुर्वांचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल. त्यासाठी गवत वाटून त्याची पेस्ट करा. हा गोळा मिटलेल्या डोळ्यांवर ठेवून त्यावरून एखादा सुती कपडा बांधा.
Leave A Reply

Your email address will not be published.