आता रेल्वेतील खानपान राहणार ऐच्छिक

दुरांतो, शताब्दी, राजधानी एक्सप्रेसच्या प्रवाशांना होणार फायदा

0

नवी दिल्ली: दुरांतो, शताब्दी, राजधानी या प्रतिष्ठित रेल्वेंमधील खानपान सेवा आता ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. या आधी या रेल्वेंमधील खानपान सेवा एखाद्याला नको असल्यास त्याला ती घ्यावीच लागत होती. यामुळे खानपान सेवेची रक्कम प्रवाशांच्या तिकिटामधूनच घेण्यात येत होती.

आता मात्र एखाद्याला या तिन्ही रेल्वेंमधील खानपान सेवा नको असल्यास तिकीट घेतानाच त्याला ते सांगावे लागणार आहे. तिकिटामधून त्याच्या खानपानाची रक्कम कमी केला जाणार असून यामुळे येत्या काळात तिकीटदरही कमी होणार आहेत.

दरम्यान, कॅगने रेल्वेतील खानपान व्यवस्थेबद्दल संसदेमध्येच ताशेरे ओढले होते. यामध्ये रेल्वेतील खाणे खाण्यास अयोग्य असल्याचेही नमूद करण्यात आले होते. यामुळे खडबडून जागे होत रेल्वेने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरलं)

आता मात्र यापुढे या तिन्ही रेल्वेंमधील प्रवासी त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतील किंवा खानपान सेवा नको असल्यास तिकिटामधून ती रक्कम वजा केली जाणार आहे. याची अंमलबजावणी कधीपासून सुरु करण्यात येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.