विमान प्रवासाचं स्वप्न करा पूर्ण, केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास

'फ्रीडम टू फ्लाय' अंतर्गत ग्राहकांसाठी नवीन स्कीम

0

नवी दिल्ली: विमान प्रवास करणं हे जवळपास प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. पण विमानाचे तिकीट महागडं असल्यानं अनेकांचं विमान प्रवासाचं स्वप्न विरून जातं. मात्र आता केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास आपल्याला करता येणार आहे. विस्तारा कंपनीने प्रवाशांना ‘फ्रीडम टू फ्लाय’ या स्कीम अंतर्गत ही ऑफर दिली आहे.

टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा या विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरनुसार, इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मात्र, तिकीट बुकींग करण्याची ही ऑफर केवळ 48 तासांसाठीच उपलब्ध आहे.

‘फ्रीडम टू फ्लाय’ ही ऑफर सोमवारी रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी बुकींग सुरु होईल आणि 9 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ही बुकींस सुरु राहील. बुकींग केलेल्या या तिकीटाच्या माध्यमातून 23 ऑगस्ट 2017 ते 19 एप्रिल 2018 पर्यंत तुम्ही प्रवास करु शकता.

‘फ्रीडम टू फ्लाय’ या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येणार आहे.

(भीम ऍप वापरणा-यांना आनंंदाची बातमी, मिळणार कॅशबॅक)

या ऑफरतंर्गत श्रीनगर-जम्मू रुटवर सर्वात स्वस्त 799 रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. यासोबतच दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-चंदीगढ या रुटचे तिकिट क्रमश: 1,199 रुपये आणि 1,299 रुपये आहे. तर दिल्ली-श्रीनगर आणि दिल्ली-अहमदाबाद या प्रवासासाठी 1,499 रुपयांत तुम्ही तिकीट बूकींग करु शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.