गोपालसेठ शायर तो नाही, लेकीन…

शायरी आणि लोकांचा उत्कृष्ट संग्रह असलेले गोपालसेठ

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला की जग जिंकता येतं. मन जिंकता येतं, माणसं जिंकता येतात. त्यातही शायराना मिजाज आणि बोलका असेल तर दूध आणि साखरेचा योग. गोपाल परमानंदजी त्रिवेदी हे याचं अत्यंत बोलकं उदाहरण. गोपालसेठ मागे गंगादर्शनाला गेले होते. परिवारातील सदस्यांनी गंगेत दिवे सोडले. गोपालसेठच्या पत्नीने त्यांच्याकडे पाहिलं. काय सोडावं गंगेत ? गोपालसेठनी क्षणार्धात पत्नीच्या सन्मानार्थ गंगेत तंबाखू सोडला तो कायमचाच. गोपालसेठ म्हणतात गंगेत सोडायचेच असतील तर अहंकार सोडा. व्यसन, विकार, कटुता सोडा.

वणी, जि. यवतमाळ येथील एकमेव मोठा चौक म्हणजे टिळक चौक, शिवतीर्थ. चौकात लोकमान्य उपाहारगृह 1955 पासून लोकसेवेत आहे. राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील इटालीखेडा येथे 3 फेबु्रवारी 1946 ला जन्मलेले गोपालसेठ आता पूर्णपणे वणीकर झाले आहेत. 100 वर्षांपूवी त्यांचे पूर्वज वणीत आलेत. वडील परमानंदजी त्रिवेदी 1955 पर्यंत वणीतील जटाशंकर चौक येथे ‘‘स्वधर्मरक्षक हॉटेल’’ चालवायचे. माणुसकीचा धर्म ही पिढी आजही जपत आहे.

स्वतः गोपालसेठ, त्यांची पत्नी सरस्वती त्रिवेदी, मुलगी शीला मुलगा जयंत, सून माया, नातू पार्थ आणि देवांश तसे हे सगळेच सोशल आहेत. व्यवहाराच्याही पलीकडे सगळ्यांशी आपलेपणाने वागणारे आणि बोलणारे त्रिवेदी कुटुंबीय आहे.

कुणाशी चर्चा करायची असेल किंवा गप्पा करायच्या असतील तर मिटिंग स्पॉट ‘‘लोकमान्य’’च. अनेकजण इथे चहाच्या घुटासोबत आपली सुख-दुःख शेअर करतो. इन्स्टंट सेलिब्रेशनही तिथे होतं. प्रॉब्लेम्स सॉल्व करणे, सोलुश्यन्स काढणे यासाठी ‘‘लोकमान्य’’ ही पाहिली पसंती.

गोपालसेठचा परिचय करून घ्यायचा असेल तर अत्यंत फुरसद काढावी लागते. लोकमान्य उपाहारगृहात त्यांनी ऑफर केलेला चहा घेत घेत त्यांना ऐकावं लागतं. मग त्यांच्यातील अनेक पैलू उलगडायला लागतात. प्रत्येकासोबत त्याच्याच विषयावर अत्यंत ताकदीने बोलण्याचे सामर्थ्य गोपालसेठमध्ये आहेत्यांचा तरूण मुलगा जयंत लोकमान्य टिळक महाविद्यालयात कार्यरत आहे. जयंत आणि गोपालसेठचेही बरेच कॉमन फ्रेण्डस् आहेत. काही तरूण तर फक्त गोपालसेठचेच फ्रेण्डस् आहेत. प्री-युनिवर्सिटी पर्यंत शिकलेल्या गोपालसेठचा मित्रवर्ग सर्वच वयोगटातला आहे.

इकडून तिकडून ऐकता ऐकता गोपालसेठजींना शायरीचा शौक लागला. मी कवी असल्यामुळे स्वाभाविकतः ते कवितेवरच बोलतात. पुढील त्यांच्या आवडीचे शेर ते नेहमी ऐकवितात.
बुलंदे अर्श पे दबदबे थे जिनके
वो जमिनदोस्त हो गए और मजार का पता नही
हा शेर ते ऐकविताना जीवनाचं वास्तव ते मांडतात. माणसानं जगाव कसं याचंही तत्त्वज्ञान ते बरेचदा साध्या शेरमधून मांडतात.

कुछ तू ही समझ ले मफहूम मेरे मनका
हसता हुआ चेहरा तो जमाने के लिए है
माणसाच्या अंतरातला भाव ओळखण्याची गोपालसेठ यांची खुबी आणि खासियत आहे. चेह-यावरूनच ते व्यक्तीचं अंतरंग जाणतात.

आसू नही है तयार आज दामन पे आने के लिए
मुश्किले आई है मुझे आजमाने के लिए
कितनी महंगी है दोस्त इस जमाने की खुशिया
के मुद्दते रो रहा हू मुस्कुराने के लिए
जगण्यातल्या सर्वच प्रसंगांना स्वीकार करावं लागतं असं गोपालसेठ म्हणतात. त्यासोबतच कर्माचाही त्यांचा आग्रह असतो.

आसुओं दिल की दहलीज पे आया ना करो
अपने हालात जमाने से बताया ना करो
लोक मुठ्ठी मे नमक लिया फिरते है
अपने जखमों को किसी को दिखाया ना करो
जगताना अत्यंत आनंदात जगावं. हे ते त्यांच्या कृतीतून दाखवितात. जगण्याचं रडगाणं करण्यापेक्षा, गाणं म्हणत जगावं असा गोपालसेठचा मार्ग आहे.

कोई किसी के दर्द का हामील न रहा
भाई भी ऐतबार के काबील न रहा
थे कांच के तो हम पे संगे बार थे
और पत्थर के बने तो कोई मुकाबील न रहा
आपण नम्र, स्वच्छ, प्रामाणिक, शीलवंत व उत्तम असावं. त्यासोबतच जगरहाटीचे भान ठेवावं. प्रसंगी कठोरही झालं पाहिजे. जिथे जसं वागायचं तसं तिथं वागलंच पाहिजे. माणुसकीची जबाबदारी आपली असते, इतरांची नाही. त्यामुळे आपण आपल्यातील माणूस सदैव जिवंत ठेवावा. हे साधं सोपं तत्त्वज्ञान गोपालसेठचं…


त्यांच्या आवडीचे काही शेर खास आपल्यासाठी देत आहे….

मिट्टी मलेंगे पाक हो जाएंग हम
ऐ जमीन एक दिन तेरी खुराक हो जाएंगे हम
ए गरिबी हमे बीच रास्ते मत छोडना,
ए अमिरी हमसे दूर रहे, नापाक हो जाएंगे हम.
…..
हसती हुई आखों मे भी
गम पलते है
कौन मगर झाकें
इतनी गहराई में

इश्क उनको अता नही होता
जिस के दिल मे खुदा नही होता
लोग उम्र गुजार देते है
लेकीन वादे वफा नही होता….
………………..
अजीज दम का भरोसा नही
जरा ठहर जाओ
चराग लेके कहा
हवा के सामने चले
………….
बुलंदी देर तक किस के हिस्से मे रहती है
हर उंची इमारत एक दिन खतरे मे रहती है

लोकमान्य उपाहारगृहाशी अनेकांची नाळ जुळलेली आहे. माझे वडील वामनराव ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात होेते. तिथला स्टाफ अजूनही इथे येतो. लो. टि. महाविद्यालयाचा स्टाफ येतो. अनेकजण नियमित इथे येतात. विविध राजकीय पक्षांचे लोकही येतात. रात्री लोकमान्य उपाहारगृहाची सेवा बंद झाल्यावरही अनेक विषयांवर गपा, चर्चा, परिसंवाद रंगतात. गोपालसेठचे वय 70च्या वर आहेत; पण मनाने अजूनही चिरतरूण. त्यांना उत्तम आर्युआरोग्य लाभो. प्रचंड एनर्जेटिक अशा पर्सनॅलिटीला सलाम…

Leave A Reply

Your email address will not be published.