जे खळांची व्यंकटी सांडो…..

कवी, निवेदक, मुक्त पत्रकार सुनील इंदुवामन ठाकरे यांचं स्पेशल आर्टिकल

0

 

 

तेराव्या शतकात ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट ज्ञानदेवांनी मांडली. त्यांनी ‘‘विश्वात्मक देवाला’’ समस्त प्राणीजातांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं दान मागितलं. कुणाच्या शुद्धीपत्राने तसा काही विशेष फरक पडणार नव्हता त्यांच्या कर्तृत्त्वाला. सूर्याला कधी कंदील घेऊन शोधावं किंवा पाहावं लागत नाही. त्यांचा हा लढा नाय व हक्कासाठी होता. ते लढलेत. ते जिंकलेत. सात-आठशे वर्षांपासून ते अजिंक्यच आहेत.

ज्ञानी तसेच मास कम्युनिकेशन आणि पब्लिक रिलेनमध्ये एक्सपर्ट असलेल्या संत नामदेवांसह त्यांनी वारकरीधर्माला उंचावर नेलं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व पेरणारा हा वारकरी धर्म आहे.

जगद्गुरू तुकोबारांयांनी संत नामदेवांच्या कार्याला गती दिली. सामान्य माणसाचं जगणं, त्यांच्या व्यथा, त्यांचं सुख, दुःख, लोकव्यवहार असं बरंच काही तुकोबारायांनी आपल्या अभंगातून मांडलं. विज्ञानवाद, श्रम, ज्ञान याचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. ‘‘तुका आकाशाएवढा’’ आहे हेदेखील सिद्ध करण्याची गरज नाही.

या महामानवांनी विश्वाचं कल्याणच चिंतिलं. त्यासाठी त्यांनी भरभरून लिहिलं. लोकांना सांगितलं. तुकोबारायांनी आपल्या सावकारीतली पहिली खाजगी कर्जमाफी केली होती.

ज्यांच्या तोंडी दोन वेळचं अन्नदेखील मिळत नाही अशा लाखों करोडो लोकांच्या ओठांवरतील ज्ञानदेवांच्या ओव्या आणि तुकोबारायांचे अभंग आहेत. हे लोकप्रतिनिधी होते.

एका मोठ्या साहित्यिकाने म्हटलं होतं. की ते देवाला मानत नसले तरी विठ्ठलाच्या समचरणांवर डोकं ठेवतात. कारण याच समचरणांवर ज्ञानदेव, तुकोबाराय, अशा अनेक संतांनी डोकं टेकवलं आहे.

‘‘जो जे वांछील, तो ते लाहो’’ असे विश्वात्मक देवाला दान मागणारे संत ज्ञानदेव आहेत. ‘‘ही संत मंडळी सुखी असो’’ असं मागणं मागणारे संत नामदेव आहेत. ‘‘आकल्प आयुष्य लाभो तया कुळा’’ हेच मागणं या महामानवांनी विश्वासाठी केलेलं आहे. त्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्नदेखील केले आहेत.

ज्ञानदेव, तुकोबाराय ही सर्व वैश्विक संपत्ती आहे. एका मोठ्या चळवळीचे ते नेते आहेत. आजही ते मागर्दर्शक आहेत. ज्ञानदेवांचं पसायदान हे डिटेलिंग आहे मानवतेचं. पुंडलिक वरदे हा……………..रं विठ्ठल नंतर अखिल वारकऱ्यांच्या काळजांना चिरत सर्वात आधी नाव येतं ते ‘‘ज्ञानदेव-तुकाराम’’ मग पंढरीनाथ की जय होते. येत्या-जात्या श्वासांत ज्ञानदेव-तुकाराम वसलेले आहेत. ते ऊर्जा देत आहेत.
असो,
‘‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’’
जय हरी, माऊली!

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.