कुंभा येथे विजेचा धक्याने सासू व सुनेचा  मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे  सकाळी सात वाजताच्या सुमारास कपडे वाळू घालत असताना विजेच्या धक्याने   सुनीता शंकर मोहुर्ले (30) व शकुंतला वामन मोहुर्ले (50) या  सासू सुनेचा मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना  शुक्रवारी घडली.…

वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी परिषदेचे निवेदन

विवेक तोटावार, वणीः केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणात ओबीसींसाठी आरक्षण कमी केल्याचे निवेदन ओबीसी परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ओबीसी परिषदेच्या म्हणण्यानुसार मंडळ आयोग व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसींना 27 टक्के,…

घोडदरा इथे पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात

मारेगाव: शुक्रवारी घोडदरा इथल्या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता तयार होत आहे.…

… अन् ढसाढसा रडले विद्यार्थी…

बहुगुणी डेस्क: त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद केवळ अॅकॅडमिक नव्हता. तर त्यात विद्यार्थ्यांसोबतचा जिव्हाळा होता. तो केवळ एक शिक्षक नव्हता, तर मुलांचा पालकच होता, त्यांचा मोठा भाऊ. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहित होती.…

साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मान्सून धमाका

वणी: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मान्सून सेल सुरू करण्यात आला आहे. यात विविध ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये…

पाटण पोलीस स्टेशनमध्ये योगदिन साजरा

सुशील ओझा, झरी: होमगार्ड व गुडमॉर्निग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पोलीस ठाण्यात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात होमगार्ड, पोलीस कर्मचारी व सर्वसामान्यही सहभागी झाले होते. मोहम्मद इरफान युसूफ व अविनाश…

रेती तस्करी करणारे चार ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून तेलंगणात वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केले आहे. सुमारे १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. . पाटण परिसरातील दुर्भा…

योग साधनेने जीवन आनंदी होते : तारेंद्र बोर्डेे

विवेक तोटेवार, वणी:- योग हा आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा पाया आहे. जी व्यक्ती या मार्गाने जाईल ती जीवनात आनंदी होईल. म्हणूनच आपल्या पंतप्रधानांनी या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा लाभ…

मजरा (हिवरा) ते राजूर पांदण रस्त्याचे भूमिपूजन

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी मजरा ते राजूर या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता…

दुचाकी अडवल्याने विद्यार्थी जखमी

वणी - वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर एका मुलाची दुचाकी गावातीलच दोन तरुणांनी अडविली. त्यामुळे सदर विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या…