प्रियकर पळाला प्रेयसीला गर्भवती करून, पोलिसांनी दिलं दोघांचं लग्न लावून

न डगमगता तरुणीनं दिला लढा, अखेर तिला मिळाला तिचा प्रियकर

0 487

लखनऊ: मऊ पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या मोहमदाबादमध्ये ती राहायची. त्या गावात एक दिवस एक तरुण आला. त्या दोघांची नजरानजर झाली. पहिल्या नजरेतच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांचं हे प्रकरण वाढलं. मुलगी गर्भवती राहिली आणि मुलगा पळून गेला. मात्र या कठीण प्रसंगी मुलगी डगमगली नाही. सर्व समाजासमोर तिनं सत्य स्वीकारून लढा दिला आणि अखेर ती जिंकली.

ही घटना आहे मऊ पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या मोहमदाबाद गावातली. इथं रेखा ही तरुणी राहते. आजमगढमध्ये राहणारा आदर्श हा तरुण एका दिवशी कार्यक्रमानिमित्त मोहमदाबादला आला होता. तिथं त्याची ओळख रेखाशी झाली. तो रेखाच्या प्रेमात वेडा झाला. रेखालाही तो आवडला. पुढे दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्या दोघांनाही एकमेकांशी बोलण्याशिवाय करमत नव्हतं म्हणून त्यांनी फ्रि कॉलिंग सिमकार्ड घेतलं. या माध्यमातून ते तासंतास एकमेकांशी फोनवर बोलायचे. पुढे एक दिवस आदर्शनं रेखाला प्रपोज केलं. रेखा देखील तोपर्यंत त्याच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे तिनं देखील त्याला होकार दिला आणि त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं.

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर आदर्श नेहमी तिच्या गावाला जाऊ लागला. दोघही तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला सोबत जाऊ लागले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. ते काय करत आहे याचं दोघांनाही भान नव्हतं. त्या दोघांमध्ये लग्नाअगोदर शारीरिक संबंध निर्माण झाले. यात जे व्हायचं नव्हतं ते झालं. रेखा गर्भवती राहिली. ही गोष्ट तिनं आदर्शला सांगितली. रेखाला वाटलं की आता तो आता तिला लवकरात लवकर लग्न करू असं बोलेल. मात्र झालं उलटच.

रेखा गर्भवती आहे हे आदर्श पुरता घाबरला. त्यानं घरचं सामान पॅक केलं आणि तो गावातून पळून गेला. रेखाला जेव्हा तिचा प्रियकर पळून गेला हे कळलं तेव्हा तिला धक्का बसला. खरंतर या वेळी तिला त्याची गरज होती. मात्र त्यानं याचा कुठलाही विचार न करता त्यानं पळून जाण्याचा मार्ग अवलंबला. रेखाची मानसिक अवस्था खूप बिकट झाली. तिनं अशा कठीण प्रसंगी स्वतःला सावरलं आणि झालेला सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. सुरुवातीला तिच्या घरचे तिच्यावर ओरडले. मात्र नंतर त्यांनी त्यांच्या मुलीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या प्रियकराचा शोध घ्यायला सुरूवात केली. लवकरच त्यांनी तिच्या प्रियकराला शोधून काढलं. प्रियकर सापडल्यानंतर शनिवारी पोलीस ठाण्यातच दोन्ही कुटुंबीयांची बैठक झाली आणि तिथंच सर्वांच्या संमतीनं दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. या प्रकरणी पोलिसांनी पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून दिलं.

का पळून गेला प्रियकर ?
आदर्श हा एक बेरोजगार तरुण आहे. तो स्वतःचा खर्च देखील उचलू शकत नाही. त्यातच लग्न जर केलं तर रेखाला कसं सांभाळायचं हा प्रश्न त्याला भेडसवायचा. ज्या दिवशी रेखा गर्भवती आहे हे त्याला समजलं, तेव्हा तो अपत्याच्या विचारानं आणखी घाबरला. एकाचा खर्च भागवू शकत नाही तर रेखाचा आणि त्यातच होणा-या मुलाचा खर्च कसा भागवायचा या विचारानंच तो पुरता घाबरला आणि त्यानं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला शोधून काढलं. तेव्हा पोलिसांनी त्याची योग्य प्रकारे समजूत काढली. त्यामुळे त्यानं रेखाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यानं रेखाचा पत्नी म्हणून स्वीकार केला असून त्यानं पोलीस ठाण्यातच असलेल्या मंदिरात सात फेरे घेऊन सात जन्म रेखाची साथ देण्याचं वचन दिलं आहे. या संपूर्ण प्रकरणात कुठेही न खचता हिमतीनं रेखानं लढा दिला. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...