15 वर्षांच्या मुलाचं 73 वर्षांच्या आजीबाईशी लग्न, अजब प्रेमाची गजब कहाणी

लग्नाची परवानगी न दिल्यास आत्महत्येची दिली होती धमकी

0 150

जकार्ता: प्रेम कुणावर होईल हे काही सांगता येत नाही. प्रेम म्हटलं की मग त्याची पुढची स्टेप आहे विवाह. प्रेमविवाहात जात-धर्म, वय, उंची यासारख्या गोष्टी मग गौण ठरतात. पण इंडोनेशियामध्ये एक आश्‍चर्यकारक घटना घडली आहे. एका १५ वर्षांच्या मुलाने आपल्या वयाहून चौपट वयाच्या असलेल्या महिलेशी प्रेमविवाह केला आहे. या महिलेचे वय आहे ७३ वर्षे. आता त्याने असे का केले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

इंडोनेशियामध्ये ही घटना घडली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली जात नव्हती. मात्र आम्हाला परवानगी न दिल्यास आम्ही आत्महत्या करू अशी धमकी त्या दोघांनी दिल्यानंतर त्यांच्या लग्नाला हिरवा कंदिल मिळाला. हा मुलगा आणि लग्न झालेली महिला एकमेकांचे शेजारी आहेत. सेलामत रियादीला असे या मुलाचे नाव असून त्याला मलेरिया झाला होता तेव्हा त्याच्या शेजारी राहणार्‍या रोहाया बिनती मोहम्मद जकफर या महिलेने त्याची काळजी घेतली. या दरम्यानच त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हा मुलगा लहान असल्याने त्यांनी आता शारीरिक संबंध ठेवू नयेत असे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये मुलासाठी वयोर्मयादा १९ आहे. मात्र या दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्यांना परवानगी दिल्याचे येथील अधिकार्‍यांनी सांगितले. रोहायाची यापूर्वी दोन लग्न झाली असून तिला एक मुलगाही आहे. तर सेलामतला वडील नसून त्याच्याही आईने दुसरे लग्न केले असल्याने ती त्याच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्याने सांगितले.

You might also like More from author

Comments

Loading...