हा व्यक्ती चक्क विमानातच राहतो

वर्षातील सहा महिने असते विमानात वास्तव्य

0 353

लंडन: तुम्ही कुठे राहता असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही त्याला सहाजिकच तुमचा पत्ता सांगाल. पण ६४ वर्षांच्या ब्रूस कँम्पबेल यांना जेव्हा हा प्रश्व विचारला जातो, तेव्हा ते अगदी सहज म्हणतात ‘मी विमानात राहातो’. आता हे ऐकून अनेकांचा गोंधळ उडतो. विमानात राहतात म्हणजे नेमकं काय? कदाचित ते वैमानिक असतील, तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा विमानात जात असावा म्हणून ते उपरोधिकपणे असे म्हणत असावे. पण असं नाहीय ते खरंच विमानातच राहतात.

इंजिनिअर असलेल्या ब्रूसने अठरा वर्षांपूर्वी बोईंग विमान खरेदी केलं होतं. हे विमान सेवेतून नवृत्त झाले होते. यानंतर ते भंगारातच जाणार होते, तेव्हा ब्रूसने ते खरेदी केले. आता एवढं विमान ठेवायचं कुठे? हा प्रश्न त्यांना होता. तेव्हा कोट्यवधी मोजून त्यांनी पोर्टलंडमध्ये दहा एकर जमीन विकत घेतली. त्याकाळी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून त्यांनी या विमानाचे इंटिरिअर बदलून घेतले. सुमारे सहाशे प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या विमानाचे रुपांतर त्यांनी घरात केले.

अर्थात यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली हे वेगळे सांगायला नको. सध्या ब्रूस हे आपल्या विमानात एकटेच राहतात. आजूबाजूला घनदाट जंगल आणि त्याच्या मधोमध हे विमान असे दृश्य कोणी आकाशातून पाहिले की त्यांचा संभ्रम उडतो, पण या विमानात कोणी राहतं हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा अनेकजण आश्‍चर्यचकित होतात. वर्षांतले सहा महिने ब्रूस विमानात राहतात तर उर्वरित सहा महिने ते जपानमध्ये असतात. तिथेही त्यांना असेच विमानात घर बांधायचे आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ते हा प्रयत्न करत आहेत.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...