सेल्फीनं केला घात, झालं सव्वा कोटींचं नुकसान

तिची सेल्फी ठरली एका व्यक्तीसाठी घातक

0 311

लॉस एंजिल्स: सध्या तरुणाईत सेल्फीची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. या सेल्फीच्या मोहापायी जीव गमवाव्या लागल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. आपण सेल्फी कुठं घेतोय याचं भानही अनेकांना नसते. लॉस एंजिल्समध्ये एका तरुणीच्या सेल्फीवेडापायी एका कलाकाराचं १ कोटी २८ लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालं.

सध्या लॉस एंजिल्समध्ये ‘फॅक्टरी एक्झिबिशन’ सुरू आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी जमली होती. यात तरुणीदेखील होती. प्रदर्शनासाठी ठेवलेल्या कलाकृतींसोबत फोटो काढण्यासाठी तिचा खटाटोप सुरू होता. तिथेच ठेवण्यात आलेल्या कलाकृती शेजारी ती गुडघ्यावर बसली. पण उठताना तिचा तोल गेला आणि मांडून ठेवलेली ठोकळ्यांची रचना काही सेकंदात कोलमडून पडली.

सेल्फी काढण्याच्या नादात या तरुणीने काही सेकंदात कलाकाराचं १ कोटी २८ लाख ७0 हजांराहून अधिक रुपयांचं नुकसान केलं. कलाकाराने ३0 तास मेहनत घेऊन ही कलाकृती उभारली होती पण तरुणीच्या सेल्फी काढण्याच्या मोहामुळे मात्र या कलाकाराच्या कलाकृतीचं मोठं नुकसान झालं.

NBSA
Comments
Loading...