‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा इंटरनेटवर लिक

लिक झालेला सिनेमा न पाहण्याचं अक्षय कुमारचं आवाहन

0 249

मुंबई: अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा ऑनलाइन लिक झाला आहे. हा सिनेमा ११ ऑगस्‍टला पदर्शित होणार होता. लिक झालेला सिनेमा कोणी पाहू नये अशी विनंती अक्षयने त्‍याच्या चाहत्‍यांना केली आहे.

सिनेमा लिक झाल्‍याचे शुक्रवारी काही चाहत्यांच्या लक्षात आले. त्‍यानंतर कोरिओग्राफर रेमो डिसुझाने चित्रपटाच्या निर्मात्यांना याविषयी माहिती दिली. पायरसीला आळा घालण्यासाठी याविरोधात लढा देण्याचे आवाहन अक्षयने केले आहे. तसेच याबाबत दोषींबर कारवाई करण्यात येईल असेही अक्षयने म्‍हणाला.

अक्षयकुमारच्या ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक घरात शौचालय असण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षयचे कौतुक केले होते.

NBSA
Comments
Loading...