ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबनं हटवले

भेसुरी पूजा अडकली नवीन वादात, कटप्पानं केली तक्रार

0 255

मुंबई: भेसु-या आवाजामुळे चर्चेत आलेली ठिंच्याक पूजाचे गाणे आता ऐकायला मिळणार नाही. कारण ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले आहेत. ‘सेल्फी मैने लेली आज’ आणि ‘दारू दारू’ या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र आता तिचे एकही गाणे युट्यूबर उपलब्ध असणार नाही. कॉपिराईटच्या तक्रारीवरून हे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत.

यूट्युबवर एक लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स असताना ढिंच्याक पूजाचे १२ व्हिडीओ यूट्युबवरून हटवण्यात आले आहेत. कथप्पा सिंग या व्यक्तीच्या विनंतीवरून यूट्युबने ढिंच्याक पूजाचे व्हिडीओ हटवले आहेत. यूट्यूबच्या पॉलिसीनुसार जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता. यूट्युबच्या याच पॉलिसीमुळं कथप्पाने ढिंच्याक पूजाचे व्हिडीओ हटवण्याची तक्रार केल्याची चर्चा आहे.

ढिंच्याक पूजाने काही दिवसांपूर्वी रिलीज केलेलं आपलं गाणं म्हणजेच दिलों का ‘स्कूटर है मेरा स्कूटर’. हे गाणं रिलीज झाल्यानंतर तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती कारण, तीने हेल्मेट शिवाय गाडी चालविल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे गाणं यू ट्यूबवरुन हटविण्यात आलं होतं.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...