Video: मुक्ता बर्वेनं पोस्ट केला व्हिडीओ, सोशल मीडियामध्ये खळबळ

का घाबरली मुक्ता, काय आहे या व्हिडीओमध्ये ?

0 200

मुंबई: सध्या मुक्ता बर्वेच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की एकतर मी तुरुंगात आहे, मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय .. पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं . मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं .. ही व्हिडीओ तिनं तिच्या फेसबुक पेज वर अपलोड केला. या व्हिडिओत मुक्ता अतिशय घाबरलेली दिसत आहे. तिच्या चेहर्‍यावर घाम आणि कपाळावर रक्त दिसतंय..

हा व्हिडिओ व्हाट्सअँपवरसुद्धा वायरल झालाय. मुक्ताच्या फेसबुक पेज वर अंदाजे १.२५ लाख फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ आता पयर्ंत २0 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर १00 च्या वर तो फेसबुकवर शेअर झालाय. व्हॉट्स अँपच्या शेअर्सची तर गिनतीसुद्धा नाही.

मुक्ताच्या पेजवर १00 च्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या कंमेंट्स सुद्धा झाल्या आहेत . पण नक्की काय आहे हे मात्र अजूनही समजले नाही.सध्याच्या ऑनलाइन जगात मुक्ताच्या या विचित्र व्हिडिओची चर्चा मात्र तुफान सुरू आहे. मुक्ता नेमकी इतकी कुणाला आणि कशासाठी घाबरली आहे आणि त्यामागे कोणतं सत्य लपलं आहे हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे.

काहीजण मुक्ताला काळजी घ्यायला सांगत आहेत तर काहींच्या मते नवीन सिनेमा, मालिका किंवा एखाद्या नवीन नाटकाचं प्रमोशन आहे. नक्की काय आहे हे पाहण्यासाठी मात्र मुक्ताच्या पुढील व्हिडिओची किंवा मुक्ताच्या ऑफिशिअल स्टेटमेंटची वाट पहावी लागणार आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...