प्रार्थना लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

कोण आहे प्रार्थनाचा 'मितवा' ?

0 434

मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ मालिका आणि त्यानंतर ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यासारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच विवाहबद्ध होणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. ऑगस्टमध्ये प्रार्थना आणि अभिषेक साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे आई-वडील आणि कुटुंबियांच्या पसंतीला होकार देत प्रार्थना अरेंज मॅरेज करतेय.

एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि प्रार्थनाची ओळख झाली. एका मुलाखतीत याबद्दल प्रार्थना म्हणाली की, अभिषेक आणि माझ्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्याने तो चांगला जोडीदार ठरू शकतो असं मला वाटलं. त्यामुळे त्याला पसंत केलं. हा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून, डेस्टिनेशन वेडींग करण्याचे प्रार्थनाने ठरवले आहे. मात्र हे डेस्टिनेशन अद्याप ठरले नसून दोघेही चांगल्या लोकेशनच्या शोधात आहेत.

चित्रपट क्षेत्रातीलच जोडीदाराची निवड केल्याबद्दल प्रार्थना सांगते की, अभिनेत्री व्हायचं माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला लेखक किंवा दिग्दर्शक होण्यात रस होता. सतत फिटनेस आणि मेकअपबद्दल बोलणारया अभिनेत्यांमध्ये मी कधीच मिसळू शकत नाही. चित्रपट निर्मितीमध्ये मला जास्त आवड आहे. लेखक आणि दिग्दर्शकांसोबत गप्पा मारायला मला खूप आवडतं.

प्रार्थनाने ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून एन्ट्री केली होती. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ चित्रपटांतून प्रार्थना नावारुपास आली. तिचे ‘जय महाराष्ट्र धाबा भटिंडा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हे चित्रपट देखील गाजले.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...