राजमाता शिवगामी देवीचा मॉडर्न अवतार

राजमाता शिवगामीचे फोटो होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

0 542

हैदराबाद: ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटामध्ये घरंदाज ‘राजमाता शिवगामी देवी’च्या भूमिकेत झळकलेल्या रम्या कृष्णनच्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. ‘मेरा वचन ही मेरा शासन है’ असे म्हणणारी करारी शिवगामी देवी सर्वांचीच फेव्हरेट बनली. पण ही अभिनेत्री खर्‍या आयुष्यात बरीच मॉडर्न असून तिचा मॉडर्न लूक नुकताच पाहायला मिळाला.

रम्याने ‘जस्ट फॉर वुमन’ या मासिकाच्या कव्हर पेजसाठी हे फोटोशूट केले असून ती यामध्ये मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे. रम्याचा हा ‘कव्हर गर्ल’ लूक अनेकांचे लक्ष वेधत आहे. कोणत्याही भडक रंगांचा आणि भडक मेकअपचा यामध्ये वापर न करता तिचा लूक साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘रम्या एफसी’ या फॅनपेजच्या इन्स्टाग्राम अकाऊंद्वारे या नव्या लूकमधील एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

mirchi
Comments
Loading...