संजय दत्त झोपेतून उठला चक्क दोन दिवसांनंतर

संजुबाबाची कहाणी येणार लवकरच पडद्यावर

0 187

मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तला ड्रग्जची सवय कशी लागली.. आणि ही सवय त्याच्या आयुष्यावर कशी भारी पडली.. हेदेखील या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ड्रग्ज घेतल्यामुळे संजयची प्रकृती खूपच बिघडली होती.. याचा सर्वात जास्त त्रास त्याच्या वडिलांना म्हणजे सुनील दत्त यांना सहन करावा लागला. त्यांनी संजयला उपचारासाठी अमेरिकेलादेखील पाठवले होते. सिनेमातल्या याच भागाचे शुटिंग न्यूयॉर्कमधल्या एका रिहॅब सेंटरमध्ये होणार आहे.

संजयच्या ड्रग्ज नादाचा एक किस्सा भलताच चर्चेत आहे.. ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय एकदा घरी येऊन झोपला.. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या बाजुला उभा राहिलेला नोकर त्याची अवस्था पाहून रडत होता.. त्याच्याशी बोलत असताना आपल्याला तब्बल दोन दिवसांनंतर शुद्ध आल्याचे संजयच्या लक्षात आले. यावेळी भूकेने तो व्याकूळ झाला होता. संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही.. सिनेमा कधी प्रदर्शित होणार हेदेखील अजून निश्‍चित नाही.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...