सोनम कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ?

सोनमनं आता लग्न करावं अशी अनिल कपूरची इच्छा

0 259

मुंबई: सोनम स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल कितीही गुप्तता पाळत असली तरीही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मात्र सर्व काही उघड होत आहे. दिल्लीस्थित आनंद अहुजासोबत सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे. त्यातच आता नव्याने एका चर्चेची भर पडली आहे. ती चर्चा म्हणजे सोनमच्या लग्नाची. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार सोनमने आता लग्न करावं अशी अनिल कपूर यांची इच्छा आहे.

कपूर कुटुंबियांसोबत जवळचं नातं असलेल्या एका व्यक्तीने या वृत्तपत्राला सोनमच्या लग्नासंबंधीची माहिती दिली. सोनमने आताच लग्न करण्याची योग्य वेळ आहे, असं खुद्द अनिल कपूर यांनाच वाटतंय. सोनमच्या मित्रपरिवाराने लग्न आणि करिअर याविषयी शंका मांडली. पण, सोनमने त्याचा फार काही विचार केला नाहीये. आनंदसोबतच्या तिच्या नात्यात सर्व काही सुरळीत सुरु असून, येत्या काही दिवसांमध्ये ती लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकते असं म्हटलं जातंय.

सोनमच्या लग्नाच्या नुसत्या चर्चांनीच प्रेक्षकांमध्ये आणि बॉलिवूड वर्तुळात एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेव्हा आता तिच्या लग्नाबद्दल कोणत्या अधिकृत घोषणा केल्या जातात का, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण, फॅशनिस्टाच्या लग्नात अनोखा बाज पाहायला मिळणार यात शंकाच नाही.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...