दापुरा येथे कुपोषीत बालक, स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर संपन्न

0 500

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील दापुरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व गरोदर व स्तनदा माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 90 गरोदर माता, 30 स्तनदा माता व 35 बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजुंना मोफत औषधीचे वाटपही करण्यात आले.

आरोग्यधाम हॉस्पीटल ऍन्ड क्रिटीकल केअर सेंटर दिग्रसचे संचालक तथा सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव यांच्यासह कुपटा आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मोबीन खान, बालरोग तज्ज्ञ डॉ. राहूल पाटील आदींनी कुपोषीत बालक व गर्भवती रूग्ण मातांची तपासणी केली. यावेळी गर्भवती मातांना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. श्याम जाधव म्हणाले की…
गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते. सध्या उन्हाळयाची चाहूल लागत असून या काळात गर्भवती मातांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच कुपोषीत बालकांना सकस आहार देणे आवश्यक आहे. असेही डॉ. श्याम जाधव म्हणाले.

मानव विकास अंतर्गत आयोजीत या शिबिरासाठी आरोग्य विभागाचे कांदळे, खान, शाह यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

mirchi
Comments
Loading...