पावसाळ्यात डासांपासून करा बचाव

'हे' उपाय केल्यास होईल डासांपासून बचाव

0 283

पावसाळ्यात असलेलं रोमॅन्टिक वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र हे वातावरण अनेक रोगराई घेऊन येते. यातील बरेचशे रोग हे डासांपासून होते. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्यासारखे आजार डास चावल्यामुळे होतात. सध्या देशभरात अनेक ठिकाणी या विकारांची साथ पसरली आहे. त्यामुळे या काळात डासांपासून बचाव करणं गरजेचं आहे. डासांना कोणत्या गोष्टी आकर्षित करतात आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं.

पावसाळ्यात घरात ओलसरपणा आणि दमटपणा वाढतो. असं दमट आणि कुंद वातावरण डासांच्या पैदाशीसाठी पोषक मानलं जातं. घरातून बाहेर टाकल्या जाणार्‍या वायूमुळे निर्माण होणारी उष्णता तसेच सुगंधी साबण, अत्तर, लोशन यांच्या वासामुळे डास आकर्षित होतात.

पावसाळ्यात अंग झाकणारे कपडे घाला. लांब बांचे शर्ट, कुर्ते तसेच पाय पूर्ण झाकणारे कपडे घाला. पादत्राणंही पावलं झाकणारी असू द्या. उघड्या त्वचेवर डासविरोधी क्रिम लावता येईल. घरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पिंप, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा. घरात अस्वच्छ पाणी ठेऊ नका. अंधार पडल्यावर दारं आणि खिडक्या बंद करा. पडदे लावल्यामुळे डास प्रकाशाकडे आकर्षित होणार नाहीत. खिडक्यांना बारीक जाळ्या लावून घ्या.

डास प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे सोडियम लाईट्स, पिवळे दिवे किंवा एलईडी लाईट्स बसवून घ्या. लसणाच्या वासामुळे डास मरतात. दोन कप पाण्यात लसणाच्या पाकळ्या घाला. पाणी उकळून घ्या. पाणी थंड झालं की स्प्रे करता येईल अशा बाटलीत भरा. घरभर शिंपडा. कडुनिंबाचं तेल आणि खोबरेल तेल एकास एक अशा प्रमाणात घ्या. बाटलीत भरून ठेवा. शरीराला चोळा. कडुनिंबाच्या तेलामुळे डास जवळ येणार नाहीत. तुळशीच्या रोपामुळे डास दूर पळतात.

लॅवेंडर तेलाचा वास डासांना आवडत नसल्याने याचाही वापर करता येईल. लॅवेंडर सुगंधाच्या मेणबत्त्या लावता येतील किंवा हे तेल घरभर शिंपडता येईल. या दिवसात गडद रंगाचे कपडे घालू नका. डास काळ्या आणि निळ्या रंगाकडे विशेष आकर्षित होतात. त्यामुळे हे रंग कटाक्षाने टाळा. या दिवसात फुलांच्या सुगंधाची अत्तरं लावू नका.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...