का होते चामखीळ ? कशी घालवावी चामखीळ

चामखीळ घालवण्यासाठी काही देसी उपाय

0 544

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात. काही वेळा शरीराच्या ओलसर राहणाऱ्या भागात (उदा., शिश्न आणि योनिमार्गाच्या भागात) लाल, मऊ, फुलकोबीसारख्या चामखिळी दिसतात.

काय आहेत चामखिळीवर उपाय ?
अनेकदा चामखीळ उपचाराशिवाय नाहीशी होते. विषाणूंच्या संसर्गाला रोगप्रतिकारक्षमता निर्माण झाल्यामुळे असे घडते, असा अंदाज आहे. ती काढून टाकण्यासाठी चामखीळ झालेल्या जागी घोड्याचा केस बांधतात. तसेच विद्युत् सुई तापवून चटका देतात किंवा लेसर किरणांचा मारा करतात किंवा चामखिळीच्या ऊती शुष्क बर्फाने गोठवितात.

काही वेळेला शस्त्रक्रियेने चामखीळ काढून टाकतात. अशा वेळी, चामखीळ झालेल्या जागी वेदना होऊ नयेत म्हणून तेवढा भाग बधिर करतात. घरगुती उपचार पद्धतीत प्रामुख्याने रसायने लावतात. मात्र, अशा पद्धतींमुळे चामखीळ पूर्णपणे बरी होत नसल्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तेथे चामखीळ वाढल्याचे आढळते.

चामखिळीवर काही घरगुती उपाय

सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चिमखिळीवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर चामखिळीचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.

लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस चामखिळीवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये चामखिळीला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

बेकिंग सोडा: चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

लसून: लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या चामखिळीवर घासा किंवा त्याची पेस्ट चामखिळीवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...