महिला कर्मचा-यांनी पुरुष कर्मचा-यांना ऑफिसमध्ये राखी बांधण्याचा आदेश अखेर रद्द

ऑफिसके भय्या मेरे अब राखी के बंधन को ना निभाना

0

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर दमण आणि दिव प्रशासनाकडून देण्यात आलेला वादग्रस्त आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणार्‍या दमण आणि दिवमधील सरकारी कर्मचार्‍यांना राखी बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी उपसचिव यांच्या स्वाक्षरीने परिपत्रकदेखील काढण्यात आले होते. रक्षाबंधनानिमित्त महिला कर्मचार्‍यांनी कार्यालयातील पुरुष सहकार्‍यांना राखी बांधावी, असे आदेश परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले होते. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात सोमवारी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी कार्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा, असे आदेश दिव दमण प्रशासनाच्या उपसचिवांनी दिले होते. यासाठी उपसचिव गुरुप्रीत सिंग यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक जारी केले होते.

सोमवारी सर्व महिला कर्मचार्‍यांनी कार्यालयातील त्यांच्या पुरुष सहकार्‍यांना राखी बांधावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. हा आदेश दिव दमणमधील सर्व उच्चपदस्थ अधिकार्‍यांना पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे ७ ऑगस्टमधील कार्यालयीन उपस्थिती दुसर्‍या दिवशी म्हणजेच ८ ऑगस्टला तपासण्यात येईल, असाही उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला होता.

(Video: दोन पर्यटकांचा स्टंटबाजी करताना दरीत कोसळून मृत्यू, व्हिडीओ व्हायरल)

या आदेशावर जोरदार टीका झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करावा, यासाठी प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र यामुळे एकाच कार्यालयात काम करणार्‍या प्रेमी युगुलांची गोची झाली होती. या आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्याने अखेर हा आदेश मागे घेण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.