आता स्मार्टफोनमध्ये आधार कार्ड, mAadhaar अॅप लाँच

आता खिशात आधार कार्ड ठेवण्याची गरज नाही

0

मुंबई: अनेकांना आधार कार्ड सोबत घेऊन फिरणे शक्य होत नाही. किंवा काही लोक आधार कार्ड विसरतात तर काही लोक ते हरवू नये म्हणून सोबत ठेवत नाही. हॉटेल असो किंवा अनेक ठिकाणी आपल्याला आधार कार्डाची गरज भासते मात्र अशा वेळी जर खिशात आधार कार्ड नसलं तर आपली पंचायत होते. पण यावर आता उपाय निघाला आहे. आता तुमचं आधार कार्ड तुम्हाला थेट स्मार्टफोनमध्येच ठेवता येणार आहे.

UIDAI ने mAadhaar हे मोबाइल अॅप लाँच केलं आहे. mAadhaar या अॅपसाठी यूजर्सला आपला मोबाइल नंबर UIDAIवर रजिस्टर करणं गरजेचं आहे. हे अ‍ॅप तुम्ही गुगल स्टोरवरून डाऊनलोड केल्यावर अॅपमध्ये आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो देखील असणार आहे. या अॅपमुळे आपल्या स्मार्टफोनमध्येच आधार कार्ड अॅक्सेस करता येणार आहे.

हे अॅप सध्या अँड्रॉईड यूजर्संसाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करता येईल. लवकरच iOS यूजर्ससाठी देखील अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपच्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये यूजर आपला बायोमॅट्रिक डेटा आपल्या इच्छेनुसार लॉक आणि अनलॉक करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.