रेल्वेचे जेवण माणसांना खाण्यायोग्य नाही

कॅगनं सादर केलेल्या अहवालात आलं समोर

0 192

नवी दिल्ली: रेल्वेचे जेवण हे सामान्य माणसाच्या खाण्यालायक नाही, असे कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखापालने सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अनेकदा प्रवासी रेल्वेच्या कँटीनमध्ये मिळणार्‍या खाण्याची आणि त्याच्या दर्जाची तक्रार करतात. आता कॅगनेही त्याला दुजोरा दिला आहे.

रेल्वेमध्ये अशुद्ध, डब्बाबंद आणि निष्कृट दर्जाच्या साहित्याचा वापर जेवण तयार करण्यासाठी केला जातो. यातल्या डब्बाबंद पदार्थांची एक्सपायरी डेटही संपलेली असते असेही पदार्थ जेवण तयार करताना वापरले जात असल्याची पोलखोल कॅगने आपल्या रिपोर्टमध्ये केलीये.

रेल्वे आणि कॅगच्या टीमने एकूण ७४ रेल्वे स्थानक आणि ८0 रेल्वेमध्ये परीक्षण केले. यादरम्यान जेवण तयार करताना स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आलेय. काही ठिकाणी तर रेल्वे किचनमध्ये अशुद्ध पाण्याचा वापर केला गेल्याचेही समोर आलेय.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...