आता ओळखा बोगस नोटा, रिझर्व्ह बँकेनं काढलं ऍप

सहज ओळखता येणार फेक नोटा

0 259

नवी दिल्ली: पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा सरकारकडून जारी करण्यात आल्यानंतर आतापर्यंत ११.२३ कोटी रुपयांच्या बोगस नोटा पकडण्यात आल्या आहेत. २९ राज्यांमध्ये कारवाईदरम्यान बोगस नोटा पकडण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना दिली आहे. त्यामुळेच बोगस नोटांची ओळख पटावी, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोबाईल ऍप लॉन्च करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ‘INR Fake Note Check Guide’ हे ऍप लॉन्च करण्यात आले आहे. या ऍपमध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या फिचर्सची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना बोगस नोटा ओळखण्यात मदत होणार आहे. आयएनआर फेक नोट चेक गाईड अँप लोकांना गुगल प्ले स्टोर आणि आयओएसवरून डाऊनलोड करता येते.

‘एनसीआरबीच्या नोंदींनुसार (राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग) आतापर्यंत १,५७,७९७ बोगस नोटा पकडण्यात आल्या आहेत. या नोटांची किंमत ११.२३ कोटी रुपये इतकी आहे’, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

बोगस नोटांना आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांना मिळणारे फंडिंग रोखण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. याशिवाय काळा पैसा चलनातून बाहेर व्हावा, यासाठीही नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा सरकारकडून जारी करण्यात आल्या.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...