अन् ए आर रेहमानच्या प्रोग्रॅममधून नाराज रसिक निघाले बाहेर

तमिळ गाणे गायल्यानं रसिकांनी मागितले पैसे परत

0 293

लंडन: केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात रहमानचे चाहते आहेत. युकेमधील वेम्बली शहरात त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट केला. पण हा कॉन्सर्ट संपण्यापूर्वीच हिंदी भाषिक चाहत्यांनी काढता पाय घेतला. रेहमानने फक्त तामिळ भाषेतील गाणी गाऊन इतर भाषिकांना धोका दिल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात ट्विटरवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने ती सर्वांवर थोपवू शकत नाही, असे तामिळ लोकांचे म्हणणे आहे. दाक्षिणात्य लोकांना हिंदी फारशी बोलता येत नसल्याचा अनेकांचा समज आहे. तर संगीताचे चाहते भाषेबाबत इतके पक्षपाती कसे असू शकतात असे तामिळ भाषिकांचे मत आहे.

रेहमानने हिंदी गाणे गायले नाही म्हणून चाहते इतके रागावले की त्यातल्या काही चाहत्यांनी चक्क आयोजकांकडे पैसे परत करण्याची मागणी केली. या सर्व प्रकारावरून सोशल मीडियावर तामिळ भाषिक आणि हिंदी भाषिक रहमानच्या चाहत्यांमध्ये ट्विटर युद्ध सुरू झाले आहे. तामिळ भाषिकांचे म्हणणे आहे की शोचे नाव नेत्रु, इंद्रु, नलाई असे होते. हिंदीमध्ये त्याचा अर्थ काल, आज आणि उद्या असा होतो.

जर कोणाला तामिळ भाषा समजत नसेल आणि त्यांना या भाषेतील गाणी ऐकायची नव्हती तर त्यांनी शोचे नाव वाचूनच तिथे जायला नको होते, असे रहमानच्या तामिळ भाषिक चाहत्यांचे मत आहे. तर दुसर्‍या बाजूला हिंदी भाषिक चाहत्यांच्या मते रेहमान हे हिंदुस्तानी कलाकार आहेत म्हणून त्यांनी बॉलिवूडचीसुद्धा काही गाणी गायला हवी होती.

हे भाषिक युद्ध बाजूला ठेवल्यास केवळ ए आर रहमानचे चाहतेच नाही तर संगीताच्या चाहत्यांसाठी भाषेचे बंधन नसावे असे अनेकांना वाटते. त्यामुळे रहमानने दिल से रे गायले किंवा कन्निरे गायले तरी त्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. अखेर एक चांगले संगीत आणि गाण्याचे उत्तम बोल कोणत्याही भाषेचे बांधिल नसतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

NBSA
Comments
Loading...