मसाज पार्लरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कारवाईत एका मुलीची सुटका

0 780

पुणे: पुण्यातील बाणेरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. या कारवाईत एका मुलीची सुटका केली असून मसाज पार्लरची मालक महिला व तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी अर्जून दोडके (वय २७, रा. बाणेर) व अर्जून शिवदास दोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील शिवनेरी कॉलनी परिसरातील फ्लॉट क्रमांक ५ मध्ये असलेल्या ‘हेअर अॅण्ड स्पा युनिसेक्स’ मसाज सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असलुयाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पडताळणी करून छापा टाकला. यावेळी एका सज्ञान तरुणीची पोलिसांनी सुटका केली. तर मसाज सेंटरची मालक महिला मोहिनी दोडके व तिचा पती अर्जून दोडके यांना अटक केली.

 

You might also like More from author

Comments

Loading...