शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पदाला ठोकर मारणारा नेता

0 400
रवि ढुमणे, वणी: खर बघायचं झालं तर सत्तेच्या व पदाच्या लालसेपोटी पुढारी कोणत्याही स्तराला जातात._ _जो कधीच कार्यकर्ता झाला नाही. किंवा त्याने। जनतेची कामे केली नाही अशा पुढाऱ्यांना विकास व कामे कशी असते हे पण माहीत नाही_  _सामान्य माणूस गावखेड्यात कसा आयुष्य जगत असतो हे तळागाळातील कार्यकर्त्याला किंवा समजून घेणाऱ्या नेत्यालाच माहीत अन्यथा_ इथे *”मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे* “असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींची कमी नाही. होय असेही महाभाग बघितले आणि बघत आहे.  इकडे विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर असतो आणि जनतेचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पण प्रतिष्ठा बघतात. मग साधा कर्मचाऱ्याला पण हे महाभाग सोडत नाही।. एकीकडे स्वतःची संपत्ती वाढविणारे लोकप्रतिनिधी खाजगी व्यापाऱ्यांना बळ देऊन भागीदारी व्यवसायात खाजगी व्यापाऱ्यांना सहकार्य करीत शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार करीत आहेत.
*तर दुसरीकडे ज्या मायबाप जनतेनी विश्वास ठेऊन ज्यांच्या पाठीशी अद्यापही खंबीर असलेले शेतकरी पुत्र, गोंदिया-भंडारा चे खासदार नानाभाऊ पटोले यांनी लोकसभेत जाताच स्वकीयांना घरचा आहेर देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सर्वात आधी निवेदन करून विरोध पत्करला. आणि सातत्याने ओबीसी प्रश्न,शेतकरी आत्महत्या, सोबतच कर्जमाफी यावर आवाज उठविला. वारंवार शेतकऱ्यांसाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून देखील पंतप्रधान व मंत्र्यांना पाझर फुटला नसल्याचे दिसताच नानाभाऊनी सरकार विरुद्ध बंड पुकारले. भाजपात केवळ सामान्यांना दडपून टाकण्याचे धोरण दिसत असल्याने त्यांच्या मनात खदखद आणखीच वाढली. आणि शेतकरी,कष्टकरी जनतेसाठी हे सरकार काहीच करीत नसल्याचे दिसताच ज्या मायबाप जनतेनी विश्वास ठेवून निवडून दिले त्यांना आपण पदावर असून देखील न्याय देऊ शकत नाही. ही धग मनात ठेऊन त्यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी व सामान्यांसाठी नुकताच खासदारकी व पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.*
लोकनेता नाना
_भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथील फाल्गुनराव पटोले, त्यांना दोन मुले मोठे विनोद पटोले जे पोलीस सेवेत उपविभागीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले. तर दुसरे नानाभाऊ अगदी जिल्हा परिषद,सहकारी बँक, या निवडणुका जिंकून स्वतःचे वलय निर्माण करीत सामान्य जनतेच्या मनात घर करून कोणत्याही राजकीय संघटनांचा पाठिंबा न घेता स्वतःची ओळख निर्माण करणारा लोकनेता नानाभाऊ_ _मग कुठलाही कार्यक्रम असो अगदी भारतीय बैठक, म्हणजेच जेवणाच्या पंगतीत मांडीला मांडी लावून बसणारा सामान्यांचा नेता. कधी वशिलेबाजी ला थारा न देणारा,कोणाला काय काम आहे असे स्वतःहून विचारणारा नेता पहिल्यांदाच बघायला मिळाला._
     *सामान्य माणसाच्या प्रश्नावर सतत लढा देत सत्तेची व पदाची पर्वा न करता थेट लोकसभा अध्यक्षांकडे कोणतीही तमा न बाळगता राजीनामा देऊन जेव्हा नानाभाऊ नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हा असंख्य जनसमुदाय त्यांची वाट बघत होता. नानाभाऊंचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले होते.*
     *खासदारकीचा राजीनामा देऊन परत आल्यावर पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले, तेव्हा नानांनी अगदी नेहमीप्रमाणे आपल्या परखड शैलीत बाजू मांडून पुढच्याना निरुत्तर केले.  यात एका मोठ्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी ने प्रश्न विचारला की, तुम्हाला मंत्रिपद न दिल्याने राजीनामा दिला आहे का?*
*त्यावर बोलत नानाभाऊनी  उत्तर दिले आम्ही शेतकरी म्हणजेच कुणबी आम्ही देतो!*    सकाळपासून मागण्याची सवय आम्हाला नाही तर देण्याची सवय आमच्यात आहे.  त्यामुळे मंत्रिपद हा मुद्दाच नाही. या परखड शैलीतील उत्तर ऐकून दुसरा प्रश्न पुढे आलाच नाही. सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आगपाखड केली त्यावर बोलतांना नानाभाऊंनी” जे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले, व शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारण्याची भाषा करतात त्यांना शेतकरी काय माहीत. असा सूचक टोला लगावला.
Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...