औषधांची किंमत आता एका क्लिकवर, ग्राहकांची फसवणूक थांबणार

आता ऍप सांगणार औषधाची खरी किंमत

0 268

मुंबई: औषध विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी नवं अॅप सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग ऑथॉरिटीने पुढाकार घेत ‘फार्मा सही दाम’ हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना औषधांच्या खऱ्या किमती एका क्लिकवर समजणार आहेत.

देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर औषधांच्या किंमतीवरून अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं. फसवणुकीच्या अनेक तक्रारी फार्मास्युटिकल्स प्रायसिंग ऑथॉरिटीकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हितासाठी हे अॅप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे. यामुळे औषधांच्या किमतीवरून ग्राहकांची होणारी फसवणूकींचे प्रमाण कमी होईल. तसेच अशा प्रकरची फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

(हे पण वाचा: हा व्यक्ती चक्क विमानातच राहतो)

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर नियमित वापर होणाऱ्या ७८ टक्के औषधांच्या किमतींवर कोणताही फरक होणार नसल्याचे नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग अथॉरिटीने स्पष्ट केले आहे. तसेच एचआयव्ही, कॅन्सर आणि मधुमेहासह अन्य विकारांवरील औषधांच्या किमतीत घट करण्यात आली आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...