सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची नवीन खर्च मर्यादा

जाणून घ्या किती असणार सरपंचपदासाठी आणि सदस्यांसाठी खर्च मर्यादा

0 404

मुंबई: ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत मुंबई येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार आता सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उमेदवारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्‍चित केली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी संपूर्ण ग्रामपंचायत हे प्रचार क्षेत्र असेल. सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रूपये खर्च मर्यादा निश्‍चित करण्यात आलेली होती. त्यातही आता सदस्य संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.

7 व 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावात ग्रामपंचायत सदस्यासाठी 25,000 रूपये आहे आणि सरपंच पदासाठी 50,000 रूपये खर्च मर्यादा आहे.

11 व 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी 35,000 आणि सरपंच उमेदवारासाठी एक लाख रूपये खर्च करता येऊ शकेल.

15 व 17 सदस्य असलेल्या गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसाठी 50 हजार रूपये आणि सरपंचपदासाठी 1,75,000 रूपये मर्यादा आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...