रिपाइं करणार राज्यभर आंदोलन

25 जुलैपासून करणार राज्यभर आंदोलन

0

मुंबई: दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी  स्वयंरोजगारासाठी  मागासवर्गीय आर्थिक विकास  महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या आदेशानुसार येत्या दि 25 जुलै रोजी राज्यभरातील सर्व तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस  अविनाश महातेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर आणि राज्य सरचिटणीस राजा सरवदे राज्य  कार्याध्यक्ष बाबुराव कदम  यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली .

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे  32 हजार कोटी चे कर्ज माफ केले त्याचे रिपाइंतर्फे स्वागत करण्यात आले आहे . त्याप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय बेरोजगारांनी  घेतलेले कर्ज शासनाने माफ करावे . लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ तसेच आदिवासी आर्थिक विकास महामंडळ आणि  अपंग विकास महामंडळ या सर्व महामंडळाचे 635.99 कोटी चे कर्ज थकबाकी आहे . हे सर्व कर्ज माफ करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ  लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे अविनाश महातेकर भुपेश थुलकर राजा सरवदे आणि बाबुराव कदम  यांनी स्पष्ट केले .

मागासवर्गीय  महामंडळ च्या कर्ज माफीसाठी रिपाइं तर्फे येत्या 25 जुलै रोजी राज्यभरात सर्व तहसील  कार्यालय  जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर  भुपेश थुलकर राजा सरवदे बाबुराव कदम यांनी जाहीर केले .

Leave A Reply

Your email address will not be published.