चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरलं

अहमदनगरमध्ये घडली ही विचित्र घटना

0 189

अहमदनगर: एटीएममधून कॅश चोरण्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र कॅश चोरण्याचा लफडा नको नको म्हणून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरली आहे. ही घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. बँक ऑफ इंडियाचं हे मशीन असून ते एमआयडीसी परिसरात आहे. यात 2 लाख 33 हजाराची रक्कम होती. बुधवारी रात्री चोरट्यांनी एटीएम मशीन चोरली. गुरुवारी सकाळी जेव्हा लोक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

एटीएममध्ये कॅश चोरताना कोणती अडचण नको म्हणून चोरट्यांनी एटीएम मशीन चोरण्याचा निर्णय घेतला. चोरट्यांनी आधी एटीएममधला सीसीटीव्ही कॅमेरा तोडला आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीत एटीएम मशीन टाकून ते पसार झाले. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला असला तरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही चोरी कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या चोरट्यांचा शोध सुरु आहे.

(खासगी शाळेतील शिक्षकांना 2019 पर्यत बीएड पूर्ण करणं अनिवार्य, नाही तर जाणार नोकरी)

शहरातील एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र बँकेचे पोर्टेबल एटीएम बसवण्यात आले होते. या एटीएममध्ये २ लाख ३३ ह जार इतकी रक्कम होती. चोरांनी एटीएम सीसीटीव्ही कॅमेरा उध्वस्त केला असला तरी, परिसरातील इतर कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे. चोरीचा हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

You might also like More from author

Comments

Loading...