Video: दोन पर्यटकांचा स्टंटबाजी करताना दरीत कोसळून मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

दारूच्या नशेत डोंगर चढताना झाला अपघात

0 453

सिंधुदुर्ग: उत्साहाच्या भरात जीव गमवाव्या लागण्याच्या घटना सातत्यानं घडत आहे. नागपुरात धरणावर सेल्फी काढण्याच्या नादात काही तरुणांचा बुडून मृत्यू झाला, ही घटना ताजी असतानाच आता दारूच्या नशेत दोन पर्यटकांचा आंबोलीतील दरीत पडून मॄत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये हा प्रकार घडला. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या तरूणांची नावं आहेत. दारु प्यायल्यानंतर दोघं जण डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. हीच स्टंटबाजी त्यांच्या जीवावर बेतली आहे.

दारूच्या नशेत डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना काही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूची नशी इतकी होती त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. आधी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला.

(संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्तात निघणार मराठा क्रांती मोर्चा)

दरीतून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरीत कोसळलेल्या दोघांपैकी एक जण बीडचा तर दुसरा गडचिरोलीचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा…

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...