प्रो-कबड्डीत बेंगळुरू बुल्स ठरला अजिंक्य

पवन सेहरावत मॅन ऑफ द मॅच

0 574

विलास ताजने, वणी : देशात सुरू असलेल्या प्रो कबड्डी सीझन सिक्सच्या अंतीम सामन्याचा शेवट अतिशय चुरशीत झाला. बेंगलूर बुल्स आणि गुजरात फार्चून जॉइन्ट्स या दोन संघा दरम्यान मुंबईत झालेल्या सामन्याचे अंतिम गुण ( ३८-३३ ) होते. सामन्याच्या मध्यंतरापूर्वी गुजरात संघाने आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरापूर्वी केवळ ४ गुण मिळवणाऱ्या बेंगळुरू संघाच्या पवनने मध्यंतरानंतर  १८ गुण खेचून संघाला विजयश्री प्राप्त करून दिली.

पवनने २५ रेड मध्ये २२ गुण घेतले. त्याचा रेड स्ट्राईक रेट ८८% राहिला. अंतिम सामन्याचा मुख्य आकर्षक ठरलेल्या पवनला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट मोमेंट ऑफ द मॅच, टॉप स्कोरर ऑफ द मॅच असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आजच्या सामन्यातील पवनच्या खेळाचे प्रदर्शन सर्वश्रेष्ठ ठरले. पवनला होंडा मोटारसायकल बहाल करण्यात आली. कॅप्टन मोहीत कुमारचाही खेळ उत्तम राहिला. गुजरात संघाचा सुनील कुमार डिफेंडर ऑफ द मॅच ठरला. त्याने ११ टॅकल करीत ४ गुण प्राप्त केले.

 

सामन्याचे अंतिम गुण बेंगलोर ३८ तर गुजरात ३३ असे होते. मागील ३ महिन्यात एकूण १३१ सामने या प्रो कबड्डी सीझन सिक्स मध्ये साखळी पध्दतीने खेळल्या गेले. प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहेत. कबड्डी रसिकांनीही सामान्यांचा मनमुराद आनंद लुटला.
mirchi
Comments
Loading...