आता येतोय BSNL चा फिचर फोन, रिलायंस जिओला देणार टक्कर

दिवाळीपर्यत होणार फोन लॉन्च

0 425

मुंबई: एकीकडे रिलायन्स जिओनं स्वस्त फिचर फोन्स मार्केटमध्ये आणून धमाका केला असताना आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल देखील सज्ज झाली आहे. ‘बीएसएनएल’ने फिचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. ‘बीएसएनएल’तर्फे दिवाळीपर्यंत दोन हजार रुपये किमतीचा फीचर फोन सादर करण्यात येणार आहे. एका खासगी टेलिकॉम संस्थेने या विषयीचे वृत्त दिले आहे.

भारत हे इंटरनेट आणि फोनचं सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. पण अजूनही अनेकांना स्मार्टफोन परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी फिचर फोन हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे महिनाभरात फीचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे. अशी माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. या फोनच्या निर्मितीसाठी मायक्रोमॅक्स आणि लाव्हा या भारतीय कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचेही श्रीवास्तव यांनी नमूद केले.

रिलायन्स जिओतर्फे सादर करण्यात आलेल्या फीचरफोनमध्ये फोर-जीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. बीएसएनएलचा फीचर फोन साधारण 19 ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे. बीएसएनएल ही शासकीय कंपनी आधीच डबघाईला आली आहे. नवनवीन स्किम लॉन्च करून बीएसएनएल ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्यांच्या या फिचर फोन्सला किती प्रतिसाद मिळतो हे लॉन्चिंग नंतर कळू शकेल.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...