रिलायन्स जिओचा नवीन धमाका, मिळणार 380 जीबी डेटा, 7 महिने फ्री कॉल

काय आहे नवीन ऑफर ?

0 51,392

मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एक नवीन प्लान लॉन्च करत धमाका केला आहे. नव्या प्लाननुसार ग्राहकांना 7 महिने व्हॅलिडीटी आणि चक्क 380 जीबी डाटाही मिळणार आहे.

नुकताच जिओने 4 जी volet फीचर फोन आणला असून, हा फोन केवळ 15000 रूपयांत मिळणार आहे. अर्थात हे पैसे ग्राहकाकडून अनामत रक्कम स्वरूपात घेतले जाणार असून, तीन वर्षांनत हे पैसे ग्राहकाला परत मिळणार आहेत. या ऑफरचे पूढचे पाऊल टाकत रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपला नवा धमाका केला आहे. त्यानुसार  ग्राहकांना ३८० जीबी डाटा ७ महिन्यांसाठी मिळणार आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओने 210 दिवसांसाठी म्हणजेच तब्बल 7 महिन्यांसाठी व्हॅलिडीटी असणारी ऑफर लॉन्च केली आहे. त्यानुसार  ३८० जीबी डाटा मिळणार आहे. ही योजना प्राईम सदस्यांना मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ४,९९९ रुपये द्यावे लागतील. यात ग्राहक मोफत अमर्यादीत कॉलिंग, रोमिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच जिओ अॅप्सची सुविधा मिळू शकते. याच्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही. रिलायन्सच्या या नव्या प्लानने टेलिकॉम वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

mirchi
Comments
Loading...