WhatsApp घेऊन येत आहे एक नवीन फिचर

जाणून घ्या काय आहे हे नवीन फिचर ?

0

WhatsApp युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वॉट्स ऍप आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. सध्या कंपनी या फिचरची बिटा वर्जनमध्ये टेस्टींग करत आहे. या फिचर्समध्ये तुमचा व्हॉईस कॉल तुम्हाला व्हिडिओ Add Newकॉल मध्ये स्विच करता येणार आहे. तसंच या फिचरची विशेषता म्हणजे व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करतेवेळी कॉल डिस्कनेक्ट करण्याची गरज पडणार नाही.

WhatsApp सध्या व्हिडिओ कॉलची सुविधा देत आहे. जर तुम्ही कुणाला व्हॉईस कॉल करत असाल आणि अचानक तुमचं मन व्हिडिओ कॉल करण्याचं झालं, तर आधी तुम्हाला व्हॉईस कॉल डिस्कनेक्ट करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला व्हिडीओ कॉल करावा लागतो. मात्र आता या नव्या फिचरमुळे असे करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये जाऊ शकता.

(रिलायन्स जिओ मोबाईल घेत आहात, एकदा नक्की विचार करा…!)

सध्या बिटा व्हर्जनवर या फिचरचं टेस्टींग सुरू आहे. wabetainfo च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅन्ड्रॉईड बिटा व्हर्जन 2.17.263 वर गेल्या आठवड्यात या नव्या फिचरला टाकण्यात आलं आहे. सोबतच WhatsApp एका नव्या अ‍ॅपचंही टेस्टींग करत आहे. हे अ‍ॅप व्यावसायिकांसाठी तयार केलं जात आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून व्यावसायिक लोक आणि ग्राहक एकमेकांसोबत सोप्या पद्धतीनं संवाद साधू शकतील. मात्र या अ‍ॅपबद्दल अजून काही अधिकॄत स्पष्टीकरण आलेलं नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.