पळसोनी फाट्यावर रविवारी अपघात; एका इसमाचा मृत्यू

0 324

वणी, विवेक तोटेवार:  रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ रोडवरील पळसोनी फाट्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. ज्यामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.

रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कृष्णा कानोबा गेडाम (28) व त्याची पत्नी शालू गेडाम दोघेही रा. साखरवाई, जि. चंद्रपूर हे पळसोनीवरून चंद्रपूर येथे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 34 ए झेड 7705 डिस्कवरने जात होते. याच वेळी विरुद्ध दिशेने येणारे चारचाकी इंडिका वाहन क्रमांक एम एच 28 ए डी 2872ने जोरदार धडक दिली. या धडकेत कृष्णा व त्याची पत्नी यांना गंभीर इजा झाली. जखमींना वणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कृष्णाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला त्वरित वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णाच्या डोक्याला, हाताला व पायाला इजा असल्याने व अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकाने वाहनचालकाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित वाहनचालकावर कलम 279, 304 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जगदीश गोरणारे करीत आहे.

 

You might also like More from author

Comments

Loading...