ती लढत राहिली…. लढत राहिली…. आणि अखेर जिंकलीच !

मांडवी येथील मयुरी भाग्यवान नळे हिच्या थरारक प्रवासाने गाठले यशाचे शिखर

0 552

सुशील ओझा, झरीः हा तालुका तसा आदिवासीबहूल. एस. टी.च्या बसेसही मोजक्याच. अत्याधुनिक तर सोडाच; पण साध्या सुविधादेखील अत्यंत कमीच. घरची परिस्थितीदेखील विपरितच. तरी तिने जिद्द सोडली नाही. तिला जिंकायचेच होते. ती लढत राहिली…. लढत राहिली…… आणि अखेर जिंकलीच. झरी तालुक्यातल्या मांडवी या छोट्याशा गावातील मयुरी भगवान नळे हिच्या थरारक जीवनप्रवासाने यशाचे शिखर गाठलेच.

2017 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींतून राज्यात प्रथम येऊन मयुरीने आपली कर्तबगारी सिद्ध केली. तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिला दहावीत 84 टक्के, बारावीत 78 टक्के मिळवले. त्यांनतर तिने डीएडदेखील केले. परिश्रम घेऊन ती पदवीधर झाली. आपल्यात असलेल्या आत्मविश्वासामुळे ती स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला लागली. दिवसरात्र स्वतःला अभ्यासा तिने झोकून दिले. तिच्या परिश्रमाचे फळ तिला मिळाले व ती राज्यास्तरावर यशस्वी झाली. तिच्या या खडतर प्रवासाची, तिच्या परिश्रमाची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून तिचा समारंभपूर्वक सत्कार महाराष्ट्रदिनाला घेण्यात आला.

झरी तहसील कार्यालयात आयोजित विशेष समारंभात तहसीलदार आर. बी. खिरेकर, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, पाटणचे ठाणेदार शिवाजी लष्करे, नायब तहसीलदार विजय मत्ते व माजी तहसीलदार गणेश राऊत यांच्या हस्ते मयुरीला या समारंभात निमंत्रित करून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन तिचा विशेष गौरव करण्यात आला.

mirchi
Comments
Loading...