रेड लाईट एरियात पोलिसांची धाड

वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अटक

0 1,729
वणी (रवि ढुमणे): शहरातील जत्रा मैदान भागात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर इथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक व सेवाभावी संस्था आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने धाड टाकण्यात आली.  या धाडीत एका व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन कारवाई सुरू होती.
वणी शहराबाहेरील जत्रा मैदान भागात वेश्या व्यवसाय करणारी वारांगना वस्ती आहे.  या वस्तीत अल्पवयीन मुली व बाहेरून फूस लावून आणलेल्या मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची कुणकुण नागपूर येथील फ्रीडम फर्म सेवाभावी संस्थेला मिळाली. या संस्थेतील संचालक  आशा नामक महिला आपल्या चमुसह वणीत दाखल झाली.  त्यांनी स्थानिक पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांचे सहकार्य घेत सायंकाळी साडेसात चे सुमारास वारांगना वस्तीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील महेंद्र भुते,आशिष टेकाडे, स्वाती कुटे, प्रिया डांगे व ठाण्यातील एपीआय पडघन,विजय वानखडे यांना सोबत घेऊन फ्रीडम फर्म च्या जॉय नामक व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून आत पाठविले.
घरात असलेल्या मुलीने ग्राहकाकडून शंभर रुपयाच्या तीन नोटा घेतल्या. आधीच दबा धरून असलेल्या पथकांनी मोहीम फतेह करीत छापा टाकला असता आत मध्यप्रदेश येथील मुलगी मिळाली.  घराची झाडाझडती घेतली असता तेलंगणा राज्यातील व्यवसाय चालविणारी शांताबाई लावाडीया भद्रे हिला ताब्यात घेऊन 4 हजार 80 रुपये रोख रक्कम जप्त करून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या महिलेला अनैतिक व्यापार कायदा 1956 नुसार कारवाई करून ताब्यात घेतले होते. सदर झाडाझडती प्रिया डांगे या महिला पोलीस शिपायाने करून दोघींना ठाण्यात आणले.
750 X 422 PODDAR
Comments
Loading...