काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळली मधुर भंडारकरची पत्रकार परिषद

प्रोमो न करताच जावे लागले परत

0 223

नागपूर: ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी पुण्याच्या पाठोपाठ नागपूरात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद रविवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी उधळून लावले. नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सेकडो कार्यकर्त्यानी अंबाझरी मार्गावरील  हॉटेल पोरटो गोमेज समोर नारेबाजी करीत तीव्र आंदोलन केले. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट नागपूर शहरासह इतर  शहरात प्रदर्शित केल्यास पक्षाचे कार्यकर्तें रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटांचे प्रदर्शन रोखून धरतील, मधुर भांडारकर यांनी नागपूरातून त्वरित निघून जावे अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा शहर कॉग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिला आहे. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे २०१७ हे  जन्मशताब्दी वर्ष आहे. ते संपूर्ण देशात मोठया उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठीच भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने पदमश्री पुरस्काराची परतफेळ म्हणून मधुर भांडारकर ‘ इंदू सरकार’ प्रदर्शित करण्याच्या तयारीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहें.

भांडारकर यांची पत्रकार परिषद उत्तर अंबाझरी मार्गावरील पोरटो गोमेज रेस्टारेन्टमध्ये सकाळी ११.३० वाजता ठरली होती. सर्व पत्रकार तेथे जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते तिथे नारे निदर्शन करीत विरोध करीत असल्याचे कळल्याने ती रद्द करण्यात आली. भांडारकर रामदासपेठ स्थित सेंटर पांईट हॉटेलमध्ये असल्याचे कळताच काँग्रेस कार्यकर्त्यानी तिकडे मोर्चा वळविला. तेथेही संतप्त कॉग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी नगरसेवक प्रशांत धवड यांच्यासह सेकडो कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...