आबई बस थांब्या जवळ भीषण अपघात, दोन ठार

पिकअपची ट्रकला धडक दोघं गंभीर, एक बैल ठार

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील पुनवट येथून गांधीनगर (कोरपना) येथे जात असलेल्या पिकअप या वाहनाने उभ्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी घडलेल्या अपघातात पिकअप मध्ये वाहून नेत असलेल्या बैलासह पिकअप मध्ये बसून असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. सदर घटना दि.२३ बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आबई (वेळाबाई) बस थांब्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार पुनवट येथील बैलबाजारात विक्री साठी आणलेला बैल गांधीनगरला पिकअप मधून परत वाहून नेत असतांना सदर अपघात घडला. भरधाव वाहन अनियंत्रित होऊन आबई बस थांब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक मारली. यावेळी घडलेल्या अपघातात घटनास्थळी बैल ठार झाला. तर वासुदेव जयराम ठावरी वय ६०, मधुकर गंगाराम मोहितकर वय ६० या दोघांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

चालक राहूल अरुण चौधरी वय २२ (रा.तुकडोजी नगर), दिवाकर गंगाराम मोहितकर वय ५२ (रा. गांधीनगर)  हे गंभीर जखमी झाले. जखमींना वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.