बोटोणीत बसची चिमुकल्याला धडक, चिमुकला गंभीर

संतप्त गरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

0 1,299

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथे बसने बालकास धडक दिली. यात बालक गंभीर जखमी झाले. बोटोणीच्या बस स्टॉपवर आज ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वातावरण चिघळले होते.

तन्मय लाकडे वय १२ रा वाई कान्हाळगाव असे अपघात ग्रस्त चिमुकल्याचे नाव असुन. त्याला तातडीने मारेगाव  रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर बोटोणीच्या  नागरिकांनी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.

तालुक्यापासून दहा किमी अंतरावर असलेल्या बोटोणी  येथे आजोबा व नातू दोघेही काही कामा निमित्याने बोटोणी येथे आले होते. आजोबा कटिंगच्या दुकानात  कटिंग करायला गेले. दरम्यान  नातू महामार्ग ओलांडत  असताना बसने बालकास जोरदार धडक दिली. त्यामुळे  त्याला गंभीर दुखापत झाली.

बालकास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भर्ती  करण्यात आले. या अपघातानंतर बोटोणी येथील  नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष  व्यक्त  केला. अपघातानंतर  बसचालकाने मारेगाव  पोलिसात आत्मसमर्पण केले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे.

mirchi
Comments
Loading...