चारगाव चौकी येथील अपघातात एक ठार

0 509

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील चंद्रपूर रोडवरील चारगाव चौकी येथे सोमवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुचाकीला अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

सुरेश फकरूजी करमनकर (45) राहणार बल्लारशाह ब्राह्मणी रोड हे वणी तालुक्यात पटवारी या पदावर कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे चारगाव चौकी येथे आपले दुचाकी वाहन ठेऊन इतर ठिकाणी कार्य करायचे तसंच रोज बल्लारशाह ते वणी ये जा करीत असे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे वाहन घेऊन गावाकडे जात असताना त्यांच्या वाहनापुढे अचानक म्हैस आली. वाहनाची म्हशीला जोरदार धडक बसली. असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेश यांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. झालेल्या अपघातात सुरेशच्या छातीच्या बरगड्या तुटल्याने मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे सुरेश जागीच ठार झाले,असे डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...