खांदल्याजवळ दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

0 1,121

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणी कोरपना मार्गावरील खांदला फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोन्ही मृत व्यक्ती या शिरपूर येथील रहिवाशी आहे.

अब्दुल वाहाब शेख (55) हे शिरपूर येथील रहिवाशी असून त्यांचा गादी तयार करणे आणि कोंबड्या विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी अब्दुल आणि संजर मुरलीधर वालकोंडे (31) हे त्यांची दुचाकी (एमएच 29 एव्ही 2239) शिंदोला येथे गेले होते. कामकाज आटपुन दोघेही परत येत असताना खांदला फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. ही धडकी इतकी जबर होती की त्यांची दुचाकी रस्त्यापासून 20 फूट अंतरावर फेकली गेली.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे सुगम दिवेकर हे त्यांच्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात कलम 279 व 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

पंचनामा न करता मृतदेह रुग्णालयात आणल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

पाहा काय म्हणतात मृतकाचे नातेवाईक…

 

NBSA
Comments
Loading...