कुर्ली जवळ दोन दुचाकीची धडक

चार जण जखमी, पैकी दोघे गंभीर

0 2,744

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली गावाजवळ (दि.५) बुधवारला सांयकाळी सहा वाजताच्या दरम्यान दोन दुचाकीची  समोरासमोर धडक झाली. यात दोन जण गंभीर जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी आहे.

शिंदोला येथे बुधवारला आठवडी बाजार भरतो. या बाजारातून शिरपूर येथील विजय कामतवार वय ४५ आणि राकेश पारशिवे वय ३० हे दोघे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुचाकीने (क्रमांक एम.एच.३४ क्यू १४०८) शिरपूरकडे येत होते. तर त्याचवेळी साई जिनिंग मधील दोन कामगार  दुचाकीने (क्रमांक एच.एच.२७ एस २९०४) शिंदोल्याकडे बाजारात जात होते. दोन्ही दुचाकीची कुर्ली बसथांब्याजवळ समोरासमोर धडक झाली.

शिरपूर येथील विजय कामतवार आणि राकेश पारशिवे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले. तर साई जिनिंग मधील कामगारांना त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी परस्पर दाखल केले. साई जिनिंग मधील कामगारांची नावे शिरपूर पोलिसांनाही कळू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार शांताराम अक्कलवार, अमोल कोवे करीत आहे.

mirchi
Comments
Loading...