मारेगावजवळ भीषण अपघात, एक जागीच ठार

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावजवळ टिप्पर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

प्राथमिक माहिती नुसार, सुभाष सातपुते (45) रा. झाला ता. वणी येथील रहिवाशी असून चंद्रपूर येथे नोकरीला होते. ते सकाळी चंद्रपूरवरून करणवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. दरम्यान यवतमाळ वरून वणीच्या दिशेने टिप्पर येत होते. साडेदहा वाजताच्या सुमारात मारेगावपासून दीड किमी अंतरावर टिप्पर व मोटारसायकलची विनायक कोटेक्स जिनिंगजवळ जोरदार धडक झाली. यात सुभाष सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर टिप्पर चालक एकनाथ माधवराव खोटे (36) रा. यवतमाळ याने मारेगाव पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन दिवसात मारेगाव तालुक्यात हा तिसरा अपघात आहे. सततच्या अपघाताच्या घटनेने मारेगाव परिसर हादरून गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.