मारेगावमध्ये दुचाकी व चारचाकीची टक्कर

दुचाकीस्वार गंभीर जखमी

0 1,774

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी-करंजी रोडवर दुचाकीस्वार व चार चाकी वाहन यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला. शनिवारी रात्री साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार सुधाकर गीताराम गोरे वय अंदाजे ३८ रा. मार्डा जि. चंद्रपूर हे वणी वरून मारेगाव कडे आपल्या  दुचाकी क्र.एम.एच.३४  टी. ९६६२ ने मारेगाव कडे येत होते. संध्याकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान शहरातील तुळशीराम बारजवळ  चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात गोरे दुचाकी वरुन पडले. त्यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

सध्या त्यांना मारेगाव रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे. शुक्रवारला दोन ट्रक मध्ये टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. त्यानंतर अपघाताची ही दुसऱ्याच दिवशी घटना घडली.

mirchi
Comments
Loading...