कुर्ली ते शिंदोला मार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक

एक ठार तर एक जण गंभीर

0 530

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कुर्ली ते शिंदोला रस्त्यावर नादुरुस्त स्थितीत असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक लागून एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.११ सोमवारी रात्री आठ वाजता कुर्ली बसस्थानका जवळ घडली. संतोष मधुकर गौरकार ३५ रा. येनक असे मृतकाचे नाव आहे. देवीदास हुसेन लिकेवार ५० रा. हनुमान नगर (येनक) हा गंभीर जखमी आहे.

वणीतील कामे आटोपून दोघेही दुचाकीने गावाला जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशाने समोरचे काहीच न दिसल्याने सदर अपघात घडल्याची चर्चा आहे. संतोषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमीला कुर्ली येथील तन्वीर शेख आणि आगलावे गुरुजींनी उपचारासाठी एसीसीच्या दवाखान्यात नेले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला एसीसीच्या रुग्णवाहिकेने चंद्रपूरला हलविण्यात आले.

शिरपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतकाच्या मागे आई, पत्नी आणि मुलगा आहे. नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनाला रात्रकाळात दुचाकीची धडक लागून अपघात होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर दिसत नाही. वास्तविक पाहता नादुरुस्त वाहनांची माहिती संबंधित वाहन चालकाने पोलिसांना देणे गरजेचे आहे.

mirchi
Comments
Loading...