कृषी विद्यालय चंद्रपूर जिल्ह्यात हलवल्याने संताप

युवक काँगेसचे तहसीलदार यांना निवेदन

0

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने शासकीय कृषी विद्यालय यवतमाळ जिल्ह्याकरिता मंजूर केले. त्यामुळे शेतक-यामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. झरी तालुका आदिवासी बहुल असल्याने आदिवासी बांधव व शेतकऱ्यांची मुले शेतीविषयक वेगळे स्वप्न रंगवत होते. मात्र शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील मंजूर शासकीय कृषी विद्यालय मुख्यमंत्री यांच्या जन्मगावी म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या गावी हलवले. त्यामुळे झरी तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत झरी युवक काँग्रेसतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यासह झरी तालुक्यात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या काळात पिकांवर विविध आजारांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारी याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. झरी तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच तेलंगाणा राज्याच्या सीमेला लागून आहे. शेवटचं टोक असल्याने तसेच आदिवासी बहुल असल्याने या भागात विकासाची गंगा काही पोहोचली नाही.

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी. त्याची माहिती लोकांना मिळावी. त्यातून शेतक-यांना रोजगार उपलब्ध व्हावा. परिसराती शेतक-यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या या उद्देशाने सरकारने यवतमाळ जिल्ह्याकरिता कृषी विद्यालय मंजूर केले. मात्र ते विद्यालय आता चंद्रपूर जिल्ह्यात हलविल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त केला जातोय.

जर कृषी विद्यालय यवतमाळ जिल्हात परत आणलं नाही तर युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. य़ाबाबत तहसिलदार अश्विणी जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी राजीव कासावार, राजीव येल्टीवार, निलेश येल्टीवार, नागोराव उरवते, विठ्ठल गिज्जेवार, संदीप बुरेवार, नंदकिशोर किनाके, अमोल आवारी, विकास मेश्राम, देविदास कामनवार, अजय पुरके, अरुण उरवते, श्रीपत अरके, सुनील मोहजे, शरद येल्टीवार, रुपेश द्यागलवार, चंद्रशेखर बोनगीरवार, आझाद उदकवार, मनोज अडपावार, सचिन टाले, चेतन म्याकलवार, विठ्ठल चुकलवार, बालू टेकाम, संतोष जंगीलवार, जगदीश सादमवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.