अरुणोदय अभ्यास केंद्रातर्फे रेल्वे भरती कार्यशाळा

0 228

गिरीष कुबडे, वणी: वणी येथील अरुणोदय अभ्यास केंद्र नांदेपेरा रोड येथे रेल्वे परीक्षा-२०१८ संदर्भात नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB)कडून एसी लोकल पायलट, टेक्निशियल व ग्रेड- डी या पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. त्या संदर्भात विद्यार्थ्यांना रेल्वे परिक्षेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

परीक्षेचे स्वरूप पोस्टवाईज अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, नकारात्मक मार्किंग, ऑनलाइन परीक्षा व घ्यावयाची काळजी. तसेच अभ्यास नियोजन कशा पद्धतीने करायचे यावर सखोल चर्चा करण्यात आली तसंच यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत पदवीधर, बारावी, आय.टी.आय डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी अमित आस्वले, ब्रिज एज्युकेशन नागपुर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते तर अरुणोदय अभ्यास केंद्राचे संचालक अरुण वैद्य यांनी परिक्षाभिमुख अभ्यास यावर विदयार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...